Dog attack – दिल्लीच्या तुघलक रोडवरील धोबी घाट परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना तिच्यावर हल्ला झाला.
तीन कुत्र्यांनी एकाच वेळी या चिमुरडीवर हल्ला केला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरड केली. त्यानंतर मुलीला सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आता शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या मुलीवर ज्य कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यांनाही पकडण्याचे काम हाती घेण्यात आले होते मात्र अद्याप एकही कुत्रा हाती लागलेला नाही.