इंदोरी,(वार्ताहर) – परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सानिमित्त महापूजा, अभिषेक, काकड आरती करण्यात आली. ह.भ.प. रवींद्रमहाराज ढोरे यांची कीर्तनरुपी सेवा श्री ज्योतिबा महिला भजनी मंडळाचे भजन झाले. रविवारी सायंकाळी ६ वाजता छबीना पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्री धर्मनाथ महाराज मंदिर ते इंदोरी पोलीस केंद्रापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेमध्ये पाळणे, मिठाईचे दुकान, खेळण्याचे दुकान आदी वस्तूंचे दुकान थाटले होते.
मनोरंजनासाठी पाळणे, लहान मुलाचे उड्या मारायचे खेळ, गाण्याच्या तालावर जम्पिंग मनोरंजन केंद्र तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ते मोठ्या प्रमाणात दुकान थाटले आहेत. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. शोभायात्रे दरम्यान रस्त्यामध्ये आकर्षक रांगोळी कढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये बैंड बाजा, डीजे, ढोल ताशा पथक होते.