hollywood news – बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक कलाकार डीपफेक व्हिडिओचे शिकार झाले आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हॉलिवूड कलाकारांचेही डीपफेक विडिओ बनविण्यात येत आहे.
im gonna need the entirety of the adult swiftie community to log onto twitter, search the term “taylor swift ai,” click the media tab, and report every single ai generated p0rnographic photo of taylor that they can see because im fvcking done with this bs.
elon get it together. pic.twitter.com/UBOBcudzb0
— Mason🌌🏁 (@GetawayKarma) January 25, 2024
हॉलिवूड स्टार टेलर स्विफ्ट ‘डीपफेक’ची शिकार झाली आहे, तिचे एआय जनरेट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला. यानंतर आता सोशल मीडियावर एआयवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.
25 जानेवारीला आर्टिफिशियल इंटेलिजेंससह टेलर स्विफ्टचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, हे फोटो कोणी व्हायरल केले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणावर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. हे टेलर स्विफ्टच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे तिचे म्हणणे आहे.
या प्रकरणानंतर आता ‘टेलर स्विफ्ट एआय’ देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा सर्वात आधी डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता.