पुणे – अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारने दि. २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. या सुटीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २२ जानेवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या दिवशीच्या परीक्षेची तारीख यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले होते.
त्यानंतर विद्यापीठाने आज परीक्षेची नव्याने तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा येत्या सोमवारी, दि. २९ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळापत्रकातील वेळेनुसार करण्यात येत असल्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने महाविद्यालयांना केले आहे.