पुणे – पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत १६ संघांमध्ये एकूण १०० खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत रंगणार आहे.
पीवायसी हिंदु जिमखानाच्या बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, या स्पर्धेत एकूण १६ संघ असून पुरूष गटात १० संघ, महिला गटात ३ संघ आणि किड्स गटात २ संघांचा समावेश आहे.
India Open 2024 : किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का, इंडिया ओपनमधूनही बाहेर…
स्पर्धेत पुरुष गटात कारा इंटेलेक्ट वॉरियर्स, अभिज लेकर्स, राठीज माव्हरिक्स, कॅप्स रॉकेट्स, स्पेक्ट्रम किंग्स, बुल्स, वाडेश्वर विझार्ड्स, पीवायसी हॉक्स, एटीएक्स ब्लेझर्स, पॉश राप्टर, तर महिला गटात एसेस, स्पार्क्स, मर्क्युरी यांचा आणि किड्स गटात हीट, सेलटिक्स, निक्स यांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.