Ram Mandir – राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार देखील अयोध्येला जाणार असल्याचे समजते.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातच आता अजित पवार यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले.
राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्रातून यांना निमंत्रण :
– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
– प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष
– रामदास आठवले, रिपाईचे खासदार
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
– शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री