शिक्रापूर – महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना होऊन त्रेसष्ट वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव उन, वारा व पावसाची तमा न बाळगता कार्य करणाऱ्या शिक्रापूर पोलीस कर्मचाऱ्यांचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पोलीस स्थापना दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
शिक्रापूर येथील पुणे- नगर महामार्गावर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सहदेव ठुबे, पोलीस नाईक मिलिंद देवरे हे वाहतूक नियमनाचे काम करत असताना दुपारच्या सुमारास अचानकपणे एक कार रस्त्याचे कडेला थांबत ही कारमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे खाली उतरले. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करीत पोलीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बोलताना पोलीस अधिकारी व कर्मचारी हे ६३ वर्षांपासून नागरिकांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र तैनात असतात. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. खासदारांकडून अचानक झालेल्या सन्मानाने पोलीस कर्मचारी देखील आनंदित झाले.