Mukta Barve : अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. सोशल मीडियावर देखील सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेक पोस्टही ती शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारा त्रास तिने या व्हिडिओद्वारे व्यक्त केला आहे.
मुक्ता बर्वेने रस्त्यातील खड्ड्यांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच मुक्ताने रिक्षाने प्रवास केला. यावेळचा अनुभव शेअर करत तिने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मुक्ताने तोंडाला स्कार्फ बांधल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला तिने हटके कॅप्शनही दिलं आहे. “आता आपण शिकुया बसल्याजागी करायचा नाच’. यासाठी लागणारं साहित्य- रिक्षा, खड्डे आणि खड्यातून वाट काढत जाणारा रस्ता”, असं कॅप्शन मुक्ताने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. यापूर्वी देखील अनेक कलाकरांनी खड्ड्यांमुळे रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशाबाबत संताप व्यक्त केला होता.
View this post on Instagram
सध्या मुक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मुक्ताने चित्रपटांबरोबरच मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. ‘जोगवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘आम्ही दोघी’, ‘डबल सीट’ या सिनेमासह ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘अजुनही बरसात आहे’, ‘अग्निहोत्र’ या या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.