बारामती : येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वप्निल चव्हाण मित्रमंडळाचे अध्यक्ष चिऊशेठ जंजीरे यांना बारामती नगरपरिषदेच्या १५९ व्या वर्धापनदिनी ‘स्वच्छतादूत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
माजी नगराध्यक्ष जवाहर शाह-वाघोलीकर, भारती मुथा, पौर्णिमा तावरे, संध्या बोबडे, पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. जंजीरे यांनी स्वच्छताविषयक कार्यात सहभाग नोंदवत उत्तम कामगिरी केली, त्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.