Ayodhya Ram Mandir : अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या समारंभ येत्या २२ जानेवारीला होणार आहे. उपस्थित राहण्यासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत येण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची निमंत्रणे हा सध्या एक मोठा राजकीय इश्यू बनला आहे. तर दुसरीकडे मंदिर निर्माण करण्यासाठी आता पर्यंत किती लोकांनी मेहनत घेतली आहे त्यांचे कौतुक केले जात आहे. अशात मंदिराच्या गर्भगृहासाठी तयार करण्यात आलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
#WATCH | Mysuru, Karnataka: Visuals from the residence of sculptor Arun Yogiraj.
The idol of Lord Rama, carved by Arun Yogiraj will be installed in Ayodhya Ram Temple. pic.twitter.com/se3EwfKszW
— ANI (@ANI) January 2, 2024
मिळलेल्या माहितीनुसार, येत्या 22 जानेवारीला आयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गर्भगृहातील कर्नाटक येथील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांचा मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की,’अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेली रामाची मूर्ती अयोध्येत बसवण्यात येणार आहे.’
Mysuru, Karnataka: On the selection of idols carved by sculptor Arun Yogiraj for installation in Ayodhya’s Ram Temple, Yogiraj’s mother Saraswathi says, “It is the happiest moment for us, I wanted to see him crafting the sculpture, but he said he would take me on the last day, I… pic.twitter.com/TMXaDAwp7r
— ANI (@ANI) January 2, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, 51 इंच उंचीची मूर्ती तीन डिझाइनमधून निवडली आहे. ज्या मूर्तीमध्ये देवत्व असेल आणि चेहऱ्यावर बालकांसारखे भाव असतील अशा मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
मूर्तिकार योगीराज योनीची आई सरस्वती यांनी मीडियाला सांगितले,’माझ्या मुलाने बनवलेल्या मूर्तीची निवड झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी माझ्या मुलाला मूर्ती बनवतांना बघितले नाही, हा आमच्या कुटूंबासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, मी त्याने बनवलेली मूर्ती बघतली नाहीये मात्र मी नकीच अयोध्येला जाईल आणि मूर्ती बघणार, माझा मुलगा गेल्या ६ महिन्यापासून अयोध्या येथे मूर्ती बनविण्यासाठी गेला आहे.’
दरम्यान,अरुण योगीराज हे प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहे. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. अरुण यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. योगीराज सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे.
शिक्षणानंतर एका कंपनीत नोकरीही केली. यापूर्वी त्यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांचा 14.5 फूट पांढरा संगमरवरी पुतळा, महाराजा श्री कृष्णराजा वोडेयार-चतुर्थाचा पांढरा संगमरवरी पुतळा आणि म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांचीही निर्मिती केली आहे. इंडिया गेटवर स्थापित नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही त्यांनी कोरला आहे.