Randeep Hooda – Lin Laishram : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत ( Lin Laishram) लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये रणदीपच्या लग्नाच्या चर्चा होत्या. चाहते त्याला नवरदेवाच्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, अभिनेत्यानं चाहत्यांची ती इच्छा पूर्ण केली आहे.
रणदीपने मणिपुरी पद्धतीने विवाह केला आहे. त्याच्या लग्नाला त्याच्या कुटुंबासोबतच मित्रपरिवाराला देखील आमंत्रित करण्यात आले होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. यावेळी ते दोघेही मणिपुरी वस्त्रांमध्ये दिसले.
रणदीपने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते आणि डोक्यावर पगडी बांधली. तर लिन ही लाल रंगाच्या कपड्यात दिसली. तिने पोलोई हा बांबू आणि जाड कापडापासून तयार केलेला दंडगोलाकार स्कर्ट परिधान केला होता. यावेळी त्या दोघांनीही पारंपरिक वस्त्र परिधान केली होती. सेलिब्रिटींचा असा अनोखा लग्नसोहळा नेटकऱ्यांनीही पहिल्यांदाच पाहिलं होतं.
लग्नानंतर जवळपास महिनाभराने रणदीप आणि लिन हनिमूनला गेले आहेत. केरळमध्ये हे दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. त्याचे फोटो रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. केरळमधील अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी या दोघांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं.
दरम्यान, रणदीपने हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावरून काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोंमध्ये रणदीप आणि लिन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं पहायला मिळत आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटो आहेत.
या फोटोंमध्ये रणदीप शर्टलेस तर लिनने मोनॉकिनी परिधान केली आहे. अशा कपड्यांमधील फोटोंमुळेच नेटकऱ्यांनी दोघांना टोला लगावला आहे. नेटकरी म्हणाले… ‘लग्न तर खूप संस्कारांनी केलं आणि आता तुम्हाला काय झालंय’, तर ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. अश्या अनेक प्रतिक्रिया या फोटोंवर येत आहेत.