अभिनेता प्रभास स्टारर चित्रपट सालार: भाग 1- सीझफायर रिलीज झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दोन भागांच्या कालावधीतील अॅक्शन ड्रामाचा पहिला भाग २२ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
सालार रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे Tamilrockers, Telegram, Filmyzilla, Movierulz सारख्या विविध प्लॅटफॉर्मवर विनामूल्य स्ट्रीमिंग आणि डाउनलोड करता येतोय. त्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण कमाईवर परिणाम होणार आहे. याआधी शाहरुख खानचा डंकी हा चित्रपटही रिलीजसोबतच ऑनलाइन लीक झाला होता. याशिवाय ‘जवान’, ’12वी फेल’, ‘ड्रीम गर्ल 2’, ‘गदर 2’ हे चित्रपटही पायरसीचे बळी ठरले आहेत. पायरसी हा दंडनीय गुन्हा आहे.
असा अंदाज बांधण्यात आला होता कि हा चित्रपट ओपनिंग डे ला मोठी कमाई करणार अशात पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल 29 कोटींची कमाई केली आहे. ‘सलार’ हा चित्रपट 400 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. सालार जगभरात तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि कन्नडसह पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
‘सलार’मध्ये प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिनू आनंद, ईश्वरी यांच्या भूमिका आहेत. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. सालारला CBFC कडून A प्रमाणपत्र मिळाले आहे. दरम्यान ‘बाहुबली’पासून प्रभासला एकही मोठा हिट चित्रपट त्याच्या नावावर करता आलेला नाही. चाहते आणि स्वत: अभिनेता त्याच्या एका सर्वोत्तम चित्रपटाची वाट पाहत आहेत. अभिनेत्याचा आधीचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपटही कमाल दाखवू शकला नाही आणि आता सर्वांच्या नजरा ‘सालार’वर लागल्या आहेत.