पुणे : येरावडा कारागृहातील बंदीजन बुद्धीबळ संघाने नुकत्याच झालेल्या जागतिक आँनलाईन आंतर कारागृह बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावले.
त्याबद्दल येरावडा बंदीजन संघाचे प्रशिक्षक व नामवंत बुध्दीबळ खेळाडू केतन खैरे यांचा पुणे जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
काॅसमाॅस बँकेचे संचालक व जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सहसचिव मिलिंद पोकळे यांच्या हस्ते खैरे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे आदी उपस्थित होते.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या सहकार्याने येरावडा कारागृहासह देशातील चाळीस कारागृहात शिक्षा झालेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुद्धीबळ दिले जात आहे.
केतन खैरे यांच्या देखरेखीखाली येरावडा कारागृहातील बंदीजन बुद्धीबळ संघाने अवघ्या दोन वर्षांतच नेत्रदीपक कामगिरी केली आहे. जागतिक आँनलाईन आतंर कारागृह बुध्दीबळ स्पर्धेत लॅटीन अमेरिकेसह इतर देशांचा पराभव करून विश्व विजेतेपद पटकावले आहे.