Koffee with Karan 8 : दिग्दर्शिक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण 8’मध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. दीपिका पदूकोण-रणवीर सिंग, सारा अली खान-अनन्या पांडे, सनी देओल-बॉबी देओल यासारख्या अनेक कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यानंतर आता या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) हजेरी लावली. यावेळी अर्जुनने मलायकासोबतच्या नात्याबाबत भाष्य केले.
करणने मलायकासोबत लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत अर्जुन म्हणाला,”आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलण्याची ही जागा नाही. याबाबत ज्यावेळी निर्णय होईल तेव्हा आम्ही दोघेही यासंदर्भात तुम्हाला माहिती देऊ. सध्या मी खूप आनंदात आहे. आमच्या नात्याबद्दल मी एकटा काही बोलू शकत नाही. मला वाटतं रिलेशनबद्दल एकट्याने भाष्य करणं हे त्या नात्यासाठी चुकीचं ठरणारे असू शकते.’ दरम्यान, अर्जुन कपूरपेक्षा मलायका अरोरा 9 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल केले जाते.
याबाबत बोलताना तो म्हणाला, “मला ट्रोलिंगचा फरक पडत नाही. तुम्हाला या गोष्टींचा सामना करावाच लागतो. ट्रोल करणाऱ्यांना आधी मी उत्तर देत होतो. पण नंतर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो.” दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप झाल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. परंतु मलायकाच्या वाढदिवसाला तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत अर्जुनने या सर्वांना पूर्णविराम दिला होता. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. अनेकदा दोघे सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात, त्यांच्या या फोटो वर चाहत्यांचा देखील शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो.