Taarak Mehta Ka Ooltah Chashmah – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र अनेक कलाकरांनी या मालिकेला रामराम केला. मुख्य भूमिकेत असणाऱ्या दयाबेन (Dayaben) अर्थात दिशा वकानीने (Disha Vakani) 2017 मध्ये प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही.
अनेकांनी तिला मालिकेत पुन्हा परतण्याची मागणी केली. परंतु अद्याप तिचे मालिकेत पुनरागमन झाले नाही. मात्र आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नेंसीच्या कारणाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतेल अशी चाहत्यांना आशा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. याचा एक प्रोमोही समोर आला आहे. त्यामुळे आता दयाबेनची शोमध्ये एन्ट्री होणार असल्याचं मानलं जात आहे.
View this post on Instagram
नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय, की दयाबेन इथे नसल्याने जेठालाल आपले प्रिय मित्र मेहतासोबत दयाबेनला आणण्यासाठी अहमदाबाद जाण्याचं ठरवतात. टप्पू त्यांना तिकीटदेखील बुक करुन देतो. पण जेठालालला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं.
याचदरम्यान सुंदर, जेठालालला तो दयाबेनला घेऊन मुंबईत, गोकुळधाम सोसायटीमध्ये येणार असल्याचं सांगतो. दयाबेन येणार असल्याचं ऐकून जेठालाल, टप्पू, बापूजी अतिशय आनंदी झाले असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोमध्ये दयाबेन येणार असल्याचं सांगण्यात आल्यानंतर चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. पण आता खरंच दयाबेन येणार की आधीप्रमाणे या केवळ अफवा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या हा नवीन प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.