पुणे : – चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ब गटात श्रेय असलेकर (नाबाद ८७) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने सहारा क्रीककींगडम संघाचा ६ गडी राखून पराभव केला.
धायरी येथील डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना सहारा क्रिक किंगडम संघाने २५ षटकात ४ बाद १३० धावा केल्या. यात तनुश उल्हालकर २५, आदित्य भोसले नाबाद ३०, कार्तिक कोदगिरे २८, इशान शेळके १० यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
ब्रिलियंटसकडून स्टीफन शिरोडकर (२-२१), शौर्य शेलार (१-१४) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने हे आव्हान १७ षटकात ४ बाद १३१ धावा करुन पुर्ण केले. यात श्रेय असलेकरने ५६ चेंडूत १५ चौकार व १ षटकारासह नाबाद ८७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला रितम सेनने १० धावा काढून साथ दिली. सामनावीर श्रेय असलेकर ठरला.