मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministery) स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांना आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. (Mumbai News)
सीएसएमटीबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवेंनी यांनी दिली. हे पुनर्विकासाचे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) द्वारे केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेअंती अहलुवालिया यांची निवड झाली असून यासाठी 2,450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान प्रकल्प पूर्तीसाठी साधारणपणे चार वर्षांची कालमर्यादा आहे.
सीएसएमटी स्थानकावर चार मजल्यांचे नवे डीआरएम कार्यालय उभारण्यात आले आहे. दरम्यान दुमजली प्रवासी विश्रामगृह देखील असणार आहे. प्रवासी संबंधित वस्तूंच्या विक्रीसाठी इमारती, पार्सल इमारती असणार आहेत. मेल-एक्स्प्रेस आणि लोकलला जोडणारा डेक निर्माण केला जाईल. अद्यायावत पादचारी पूल, स्कायवॉक उभारणी करण्यात येईल. वारसा इमारतीच्या परिसरात मोकळ्या जागेची निर्मिती केली जाईल. संपूर्ण छताचे नुतनीकरण, रेल्वे स्थानकांलगत संरक्षक भिंत देखील उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा पूर्ण मुख्य आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच पुनर्विकास जागेभोवती बॅरिकेडिंगचे काम हे 21 टक्के पूर्ण झाले. नव्या डीआरएम कार्यालयाच्या पाया खणण्याचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. फलाट क्रमांक 18 जवळ तात्पुरते पार्सल कार्यालय बांधकाम सध्या सुरु आहे. प्रस्तावित नव्या डीआरएम कार्यालयाच्या परिसरात विविध बाबींचे स्थलांतरित करण्यात येईल.
बांधकामाचे क्षेत्रफळ
4,61,534 चौ.मी. जागेचा विकास
सीएसएमटी एकूण क्षेत्रफळ – 4,61,534 चौ.मी.
नवीन बांधकाम क्षेत्र- 2,79,507 चौ. मी.
नूतनीकरणासाठी निश्चित क्षेत्र – 1,30,912 चौ. मी.
टर्मिनसलगत मुक्त परिसर – 37,703 चौ. मी.
अन्य आवश्यक बांधकाम – 13,412 चौ. मी.