farmer news : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मुदखेड, मुखेड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बालाजी दिगंबर नव्हाते (50, रा. डोणगाव, ता. मुदखेड) व राम शिवाजी फिरंगवाड(35, रा.येवती, ता. मुखेड) असे मृतांची नावे आहेत.
डोणगाव (ता. मुदखेड) येथील शेतकरी बालाजी नव्हाते यांनी शेतातील नापिकीस व बॅंकेचे कर्जाचे हप्ते कसे फेडावे या चिंतेतून 17 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुसऱ्या घटनेत मुखेड तालुक्यातील येवती येथील शेतकरी राम फिरंगवाड यांनी गेल्या दोन वर्षांपासून शेतातील नापिकीस कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथील शेतकरी रंभाजी घुगे(वय 56)आर्थिक विवंचनेतून तसेच शेतीसाठी घेतलेल्या बॅंकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
घुगे यांच्या मालकीची 3 एकर जमीन आहे . त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बॅंकेचे 1 लाख 80 हजार तसेच सहकारी सोसायटी यासह इतर 2 लाख 50 हजारांचे कर्ज होते.