Virat kohli: भारताचा विक्रमी फलंदाज विराट कोहलीने (virat kohli) वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला. हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित होता.अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढला.
विराटनं सचिनचं रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर सोशल मीडियावर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. यातच विराटच्या बायोपिकची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावर बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने विराटच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. रणबीरनं भारतीय क्रिकेट टीमच्या प्रती आपलं समर्थन देत मला तर येत्या काळात कुणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे विचारले तर मी विराटचं नाव घेईन. कारण मी त्याच्यासारखा दिसतो. म्हणून मी त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा विचार करतो आहे. अशी प्रतिक्रिया रणबीरनं यावेळी दिली आहे. त्याच्या या विधानानंतर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
#Animal ‘s Roar on #CricketLive 🤩🇮🇳#RanbirKapoor #AnimalTheFilm #AnimalOn1stDec #INDvNZ #WorldCupOnStar @StarSportsIndia @AnimalTheFilm @AnilKapoor @iamRashmika @thedeol @tripti_dimri23#RahulMSharma @imvangasandeep #BhushanKumar @VangaPranay @MuradKhetani #KrishanKumar… pic.twitter.com/2JeeGSZFBv
— Animal The Film (@AnimalTheFilm) November 15, 2023
‘या रणबीर कपूरपेक्षा विराट कोहली याच्या बायोपिकमध्ये रणवीर सिंह चांगली भूमिका साकारेल,’ ‘अरे तू सामना बघायला आला आहेस तर तू तेच काम कर,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, रणबीर कपूर याचा ॲनिमल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. हा चित्रपट धमाका करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील रणबीर कपूर हा दिसतोय. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
दरम्यान, क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरपार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, विकी कौशल जॉन अब्राहम, कियारा अडवाणी या कलाकारांचा सहभाग होता.