Mahatma Gandhi – ज्या देशामध्ये फुटबॉल हा एखादा धर्माप्रमाणे जपला जातो त्या ब्राझीलमध्ये एखाद्या फुटबॉलपटूने लोकप्रिय होणे ही काही वेगळी गोष्ट नाही पण सध्या ब्राझीलमधील एका क्लब कडून खेळणारा फुटबॉलपटू त्याच्या नावामुळे लोकप्रिय झाला आहे या 31 वर्षे खेळाडूचे नाव महात्मा गांधी असे असून त्याच्या या नावामुळेच त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.
ब्राझीलमधील त्रिनदाद या लोकप्रिय क्लबकडून खेळणाऱ्या या खेळाडूचे संपूर्ण नाव महात्मा गांधी हाबरपियो माटसपायर असे आहे या फुटबॉल क्लबमध्ये अशा वेगळ्या नावाचे अनेक खेळाडू आहेत आता मारलन ब्रांडो ,पिकाचू, जॉन लेनोन अशा काही लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांची नावे घेऊन खेळाडू मैदानावर कामगिरी करत आहेत केवळ भारतच नव्हे तर जगभरात सत्य आणि अहिंसा ही तत्वे लोकप्रिय करण्यासाठी प्रसिद्ध असणारे महात्मा गांधी यांच्याविषयी जगात सर्वांनाच आदर आहे.
आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाविरुद्ध लढा देत असतानाच तेथील काही स्थानिक फुटबॉल संघ स्थापन करण्यामध्ये सुद्धा महात्मा गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती जोहान्सबर्ग प्रिटोरिया आणि दरबान या ठिकाणी हे तीन क्लब आणि त्यांचे संघ कार्यरत होते अर्थात ब्राझीलमधील या खेळाडूला हा इतिहास जरी माहीत नसला तरी महात्मा गांधी या नावाविषयी आकर्षण असल्यामुळेच त्याने आपल्या नावासमोर महात्मा गांधी हे दोन शब्द जोडले आहे.