भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी टीव्ही अभिनेत्री निया शर्मा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. यावेळी निया तिचा भाऊ विनय आणि मित्र अमरीनसोबत खूप एन्जॉय करताना दिसली. सामना पाहताना निया शर्मानेही जोरदार डान्स केला हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निया शर्माने मॅचसाठी डेनिम क्रॉप टॉप, जीन्स आणि ब्लॅक सनग्लासेस घातले होते. तिने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्टेडियमची काही झलक दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निया कॅमेऱ्यासमोर जोरदार नाचताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना नियाने असेही सांगितले आहे की, ‘ती पहिल्यांदा मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती.’
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना नियाने कॅप्शनमध्ये लिहिले,’आणि भारतासाठी हा एक रोमांचक विजय होता. स्टेडियममधला माझा पहिला अनुभव डान्स मॅरेथॉनपेक्षा कमी नव्हता. टीम इंडियाकडून रेकॉर्ड ब्रेकिंग क्षणांसह असा शानदार खेळ पाहिला’
निया शर्मा आपल्या बोल्ड स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते, निया शर्माचे बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. टीव्ही सीरियल्ससोबतच नियाने अनेक म्युझिक व्हिडिओ आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला
भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना देशासाठी खूप आनंददायी होता. भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत तब्बल 12 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अशाप्रकारे भारताचा हा सलग 10वा विजय आहे. भारताने याआधी वर्ल्ड कपमध्ये सलग इतके सामने कधीच जिंकलेले नाहीत. आता भारताने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे.