समाजकंटकाचे कृत्य : शेतकऱ्याचे नुकसान
जांबूत – एकीकडे शेतकरी नैसर्गिक वातावरणामुळे आर्थिक संकटात सापडला असतानाच पिंपरखेड (ता. शिरुर) येथे शेतकरी बाळू विठ्ठल बोंबे यांच्या शेतातील पीव्हीसी पाइप व ठिबक संचाची समाजकंटकाकडून तोडफोड करून नुकसान केले. यामध्ये शेतकऱ्याचे 15 हजार रूपयांचे नुकसान झाले. शिरुर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पिंपरखेड- जांबूत रस्त्यावर मीना कालव्याला लागून शेतकरी बाळू बोंबे यांचे बटाटा पीक आहे. शेतकरी बोंबे यांनी बटाटा पिक हे ठिबक सिंचनाचा वापर करून घेतले आहे.
समाजकंटकांकडून सिंचनासाठी वापरण्यात आलेला फिल्टर, पीव्हीसी पाइपची तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.6) रात्री घडली. शेतकरी वर्गातून आता संताप व्यक्त केला जात आहे.