रांजणी – जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महायुतीच्या उमेदवार अर्चना विशाल जाधव विजयी झाल्या. त्यांनी राजश्री मंगेश जाधव यांचा पराभव केला.
जाधववाडी ग्रामपंचायतीत सात सदस्यपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये दीपाली प्रवीण जाधव या बिनविरोध सदस्य म्हणून महायुतीच्या उमेदवार विजयी झाल्या . लोकनियुक्त सरपंच पदासाठी मतदान झाले , त्यामध्ये श्रीदत्त तुकाई माता ग्रामविकास पॅनलच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना विशाल जाधव यांना 460 मते मिळाली,
तर श्रीदत्त प्रभू तुकाईमाता हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार राजश्री मंगेश जाधव यांना 314 मते मिळाली. महायुतीच्या उमेदवार अर्चना विशाल जाधव या 112 मतांनी विजयी होऊन जाधववाडीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्या.
महायुतीच्या श्रीदत्त तुकाईमाता ग्रामविकास पॅनलचे विजयी सदस्य – संपत जाधव, मोहिनी जाधव, प्राजक्ता जाधव, सौरभ जाधव, शैलेश जाधव. श्री दत्त तुकाईमाता ग्रामविकास पॅनलची धुरा माजी सरपंच दत्तात्रय जाधव, अंकुशराव थोरात, महेश जाधव, बाबाजी जाधव यांनी सांभाळली. विजयी उमेदवारांचे शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,
आंबेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड. विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, तसेच एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी अभिनंदन केले.