जयपूर – राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसनेही भगव्या रंगाची मोहोर उमटवली आहे. राजस्थानचा भगवा चेहरा असलेल्या मॉं आनंदी सरस्वती यांनी गुरुवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्याचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस वॉर रूममध्ये प्रवेश केला.
मॉं आनंद सरस्वती यांचे खरे नाव ममता कलानी असून त्या मूळच्या सिंधी समाजातील आहे. यापूर्वी कलानी या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी नुकताच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे सोशल मीडियावर मॉं आनंदी सरस्वती या नावाने प्रोफाइल आहे. त्यांचे 51 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अजमेर उत्तर मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते वासुदेव देवनानी यांच्या विरोधात ममता कलानी यांना कॉंग्रेसला उतरवायचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही. कारण येथे सिंधी मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसनेही देवनानी यांच्यासमोर लोकप्रिय सिंधी चेहरा उतरवण्याची तयारी चालवली आहे.
गेहलोत साहेब ढोंगी नाहीत…
कॉंग्रेसचे सदस्यत्व घेतल्यानंतर मॉं आनंदी सरस्वती म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील क्रांतिकारी दिवस आहे. मी ज्या विषयावर काम करत आहे, ते गेहलोत साहेबही करत आहेत. काही लोक फक्त बोल असतात, पण गेहलोत जे बोलतात तेच करतात. संत राजकारणाच्या वर असतात. जगाला एक कुटुंब मानून सन्मानाची सेवा हाच धर्म आहे. गाय, गंगा, गायत्री आणि गीतामुळे आपण हिंदू आहोत. गेहलोत साहेब ढोंग करत नाहीत, जिथे दांभिकता आहे तिथे धर्म नसतो, असे त्या म्हणाल्या.