Weather Update: सध्या देशातील अनेक भागात थंडाची चाहूल लागली आहे. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तेज’ चक्रीवादळाचा (Tej Cyclone) देशातील काही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे. केरळसह ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेज चक्रीवादळ आज 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
‘तेज’ चक्रीवादळाचे रविवारी अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं मंगळवारपर्यंत चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. यामुळे चक्रीवादळामुळे (Cyclone Tej) केरळ (Karala) मध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. तसेच अनेक भागांत वादळी वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मात्र या चक्रीवादळाचे महाराष्ट्रातील हवामानावर काही परिणाम होणार नाही. राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याउलट तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
या भागात बरसणार पाऊस
भारतीय हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.