नगर – दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू-शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते. विशेषतः झेंडूला विशेष महत्त्व दिले जाते. पण यंदा या फुलांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे दिसून येत असून त्याचा परिणाम फुलांच्या बाजारभावावर झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नेहमी शंभरी गाठणारा झेंडू यंदा अवघा 30 ते 35 रुपये किलो भावाने विकला जात आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. झेंडू सारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाजारात मोठी मागणी आहे. झेंडूबरोबरच शेवंतीचे बाजारभावही घटले आहेत.
दसरा व दिवाळी पूजा-अर्चा आणि सजावटीसाठी विविध फुलांना मोठी मागणी असते. त्यात झेंडू, शेवंती, गुलाब, गलांडा, आस्टर या फुलांना विशेष पसंती असते. त्यामुळे सणांच्या काळात फुलांचे बाजारभाव चढेच असतात. यंदा मात्र परिस्थिती काहीशी वेगळी असून, संपूर्ण रब्बी हंगामात पावसाने ओढ दिलेली असताना शेतकऱ्यांनी पाण्याची काटकसर करत प्रसंगी विकत पाणी घेत फुलांचे मळे फुलवले. या फुलांच्या विक्रीतून मोठी आर्थिक कमाई होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती, तथापि दसऱ्याच्या मुहूर्तावरच फुलांच्या मागणीत घट झाल्याने बाजारभावही कमी झाले आहेत.
झाल्याचे सांगण्यात येत आहे. नगर समितीत बाजार तसेच तालुक्यातून तालुक्याबाहेरूनही फुलांची आवक होत असते. सोमवार (दि. 23) च्या बाजार समिती मिळालेले दर झेंडू 1500 ते 6000 रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव निघाले असून, सरासरी भाव 3750 रुपये क्विंटल होते. शेवंती 5000 ते 16000 रुपये प्रतिक्विंटल व सरासरी भाव 10, 500 रुपये निघाले. आस्टर फुलाला 5000 ते 18000 रुपये क्विंटल भाव असून सरासरी 11,500 रुपये भाव निघाला आहे. त्याचे भाजारभाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दसरा सणाला फुलांची मागणी मोठी असते. त्यामुळे या काळात फुलांना चांगला बाजारभाव मिळतो.
प्लास्टिक फुलांना मागणी
सजावटीसाठी आता प्लॅस्टिक फुलांचा सर्रास वापर होत असल्याने फुलांच्या मागणीत घट दिसून येत आहे. तर सजावटीसाठी प्लास्टिक फुलांना पसंती देत आहे.
दरवर्षी प्रमाणे फुलांना भाव मिळत नाही. पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाणी विकत घेऊन मळा फुलवला परंतु भाव भेटत नाही नागरिक प्लॉस्टिक फुलांना पसंती देत आहे.
नामदेव निकम, शेतकरी
अवघा 30 ते 35 रुपये किलोचा भाव, सजावटीसाठी प्लॅस्टिक फुलांना नागरिकांची पसंती
=================