नवी दिल्ली- नवी दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर खलिस्तानवादी ग्राफिटी रंगवणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी शोधून अटक केली आहे. ही खलिस्तानवादी घोषणाबाजी भिंतींवर रंगवण्याच्या कामासाठी या दोघांना 7 हजार डॉलर देण्याची हमी तयारी दाखवली गेली होती, अशी माहिती दिली पोलिसांच्या विशेष विभागाचे विशेष आयुक्त एचजीएस धालिवाल यांनी सांगितले.
दिल्ली मेट्रोच्या भिंतींवर ही खलिस्तानवादी ग्राफिटी 26 ऑगस्ट रोजी रंगवण्यात आली होती आणि हे काम करणाऱ्यांना पोलिसांनी 5 दिवसांच्या आत पकडले आहे, असेही एचजीएस धालिवाल यांनी सांगितले. कोणताही ठोस सुगावा नसतानाही पोलिसांनी या आरोपींना पकडले आहे. प्रीतपाल सिंग याला फरिदकोट येथून आणि त्याचा साथीदार राजविंदर यालाही तेथूनच अटक केली गेली.
या दोघांना हे काम करण्यासाठी पैसे देण्याचा गुन्हा सिख फॉर जस्टीसचा संस्थापक गुरुपतवंत सिंग पन्नून याच्याविरोधातही दाखल केला गेला आहे. या दोघांना 7 हजार डॉलर देण्याची हमी दिली गेली होती. त्यापैकी 3,500 डॉलर दिले गेले होते, असेही एचजीएस धालिवाल यांनी सांगितले.