मुंबई – देवयानी फेम आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘भाग्यश्री मोटे’ तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे कायमच चर्चेत असते. फॅन्सला सुद्धा भाग्यश्रीचा बोल्ड चांगलाच आवडतो. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत भाग्यश्री मोटे लोकप्रिय झाली. यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ अशा चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती.
त्याच बरोबर भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्रीने स्वतःचा असा एक वेगळा चाहता वर्ग निर्मण केला आहे.
नुकतंच, भाग्यश्रीने सोशल मीडियावर स्वतःचे काही ग्लॅमरस लूक मधील शेअर केले असून यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
इंस्टाग्रामवर तिच्या या फोटोंनी जोरदार धुमाकूळ घातला असून, अनेक जण तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून, यामध्ये तिचा मादक अंदाज देखील चांगलाच बहरला आहे.