नवी दिल्ली : ‘चांद्रयान-3’ ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर अनेक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. चंद्रावर ऑक्सिजन असल्याची सर्वात महत्वाची माहिती समोर आल्यानंतर आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा खास फोटो क्लिक केला.
इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विक्रमचे दोन पेलोड देखील स्पष्ट दिसत आहेत. “स्माईल प्लीज! प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा फोटो क्लिक केला. रोव्हरवर असणारा नेव्हिगेशन कॅमेऱ्याने (NavCam) हा फोटो टिपला आहे. LEOS म्हणजेच, लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टिम्स याठिकाणी चांद्रयान-3 चे नॅव्हकॅम तयार करण्यात आले आहेत.” असे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Chandrayaan-3 Mission:
Smile, please📸!
Pragyan Rover clicked an image of Vikram Lander this morning.
The 'image of the mission' was taken by the Navigation Camera onboard the Rover (NavCam).
NavCams for the Chandrayaan-3 Mission are developed by the Laboratory for… pic.twitter.com/Oece2bi6zE
— ISRO (@isro) August 30, 2023
इस्रोने शेअर केलेल्या फोटोमध्ये आज सकाळी 7:35 वाजेच्या सुमारास हा फोटो क्लिक केला आहे. विक्रम लँडरसोबतच या फोटोमध्ये ChaSTE आणि ILSA हे दोन पेलोड देखील दिसत आहेत.
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतून चंद्रावर पाठवलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा दिला आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात “इस्रो’चे हे मोठे यश मानले जाते आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरशिवाय इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहेत. “इस्रो’कडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे.