मुंबई – 2000 साली आलेला ‘हेरा फेरी’ आजही बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत, पण आजही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची कॉमेडी लोकांना गुदगुल्या करत आहे.
सहा वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग नीरज व्होरा यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही दिले. आता हा लोकप्रिय बॉलीवूड कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट तिसर्या भागासह देखील दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीशिवाय हेरा फेरीचा तिसरा भागाचे काम सुरू केले होते. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी ते बंद करण्यात आले होते. दरम्यान, अश्यातच सिनेमातील मुख्य कलाकार सुनील शेट्टीने हेरा फेरी 3 बद्दल एक माहिती दिली आहे. यावेळी तो माध्यमांशी संवाद साधत होता.
सुनील शेट्टी म्हणाला, “सर्वकाही ठिक राहिले आणि कोणाची नजर लागली नाही तर सप्टेंबरमध्ये आम्ही हेरा फेरी 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू करू. विशेष म्हणजे आम्ही सर्वजण हेरा फेरी 3 चे शूटिंग करण्यासाठी उत्साही आहोत. आम्ही काही दिवसांपूर्वीच प्रोमो शूट केला आहे.
मी, परेश रावल आणि अक्षय कुमार नेहमीच संपर्कात असतो. पंधरा वर्षे झाले आम्ही जोडले गेलो आहोत. आता चित्रपटाच्या शूटिंगची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहोत. हेरा फेरी 3 चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.’ असं देखील अभिनेता यावेळी बोलताना म्हणाला.