मुंबई : बॉलीवूडचा तडफदार अभिनेता नवाजुद्दीन पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हड्डी असे या चित्रपटाचे नाव असून त्यावरून गँग्स ऑफ वासेपूर सारखे धमाकेदार, हिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी नवे पोस्टर शेअर केले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेन्डरची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे.
चित्रपटाचे पोस्टर शेअर करून अनुराग कश्यपने सांगितले आहे की, चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म G5 वर प्रदर्शित होणार आहे. समोरच्या नवीन पोस्टरमध्ये नवाजुद्दीनच्या लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो लाल साडी नेसून बसला आहे आणि त्याच्या मागे अनेक ट्रान्सजेन्डर उभे असल्याचे दिसत आहे.
‘हड्डी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली नसून चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती जाहीर केली. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्माने केलं आहे, तर झी स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक जेव्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हापासून हा चित्रपट २३ ऑगस्ट २०२३ ला प्रदर्शित होणार, अशी चर्चा सुरू होती. पण अद्याप अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.