मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं आहे. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे या चित्रपटातील सर्वच मराठी अभिनेत्रींची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
अशात बाईपण भारी देवा या चित्रपटात सुकन्या मोने यांनी साधना हे पात्र साकारलं आहे. अशात सुकन्या मोनेंना खास भेटवस्तू पाठवली आहे. त्यासाठी सुकन्या मोनेंनी पोस्ट शेअर करत तिचे आभार मानले. सुकन्या मोनेंच्या या पोस्टखाली एका महिलेने कमेंट केली आहे. तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं ऐकून, अशी कमेंट एका महिला चाहतीने केली आहे. त्यावर सुकन्या मोनेंनी प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिले आहे.
मोनेंनी प्रतिक्रिया देत लिहिले,’सॉरी कोणी सांगितले मी मांसाहारी खाते?आणि कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हेसुध्दा ज्याचे त्याने ठरवायचे असते.मी शाकाहारी आहे”, असे मोनेंनी म्हटले आहे. त्यांच्या या कॉमेंट्सवर आता चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.