नवी दिल्ली- दिल्लीत मंगळवारी यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले असून सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 205.71 मीटर नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, पाण्याची पातळी सतत बदलत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लोकांना मदत शिबिरात राहण्यास सांगितले आहे.
हवामान खात्याने पुढील 4-5 दिवस दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील हरिद्वार, मसुरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सोनाली नदीच्या धरणाला तडा गेल्याने उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर शहराला पुराचा धोका आहे. हिमाचलमधील पावसामुळे अयोध्येहून कुल्लूला गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जण बेपत्ता आहेत.