केदारनाथ मंदिराच्या परिसरात फोटोग्राफी आणि फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. एका महिला ब्लॉगरने मंदिरासमोर प्रपोज केल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्यानंतरच मंदिर प्रशासनाने मोबाईल आणि कॅमेऱ्यांवर बंदी घालण्यास सांगितले होते.
मंदिर परिसरात चेतावणी देणारे फलक –
मंदिर समितीने केदारनाथ मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घातली आहे. मंदिर समितीने केदारनाथ मंदिर परिसरात ठिकठिकाणी चेतावणी देणारे फलक लावले आहेत की कोणी फोटो काढताना किंवा व्हिडिओ बनवताना पकडले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
#WATCH उत्तराखंड: श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिति ने केदारनाथ मंदिर के अंदर फोटोग्राफी और वीडियोग्राफी पर प्रतिबंध लगा दिया है। मंदिर समिति केदारनाथ मंदिर परिसर में जगह-जगह चेतावनी बोर्ड लगाई कि अगर कोई फोटो लेता या वीडियो बनाता पकड़ा गया तो उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की… pic.twitter.com/7yuMj9ysmC
— ANI_HindiNews (@AHindinews) July 17, 2023
बद्रीनाथ समितीचे निवेदन –
श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजय अजेंद्र यांनी एएनआयला सांगितले की, “काही यात्रेकरू मंदिराच्या आत अशोभनीय रीतीने व्हिडिओ आणि रील्स बनवत होते आणि फोटोही क्लिक करत होते, त्यामुळे केदारनाथमध्ये मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी चेतावणी देणारे फलकही लावण्यात आले आहेत.”
‘प्रपोज’ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता –
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मुलगी मंदिरासमोर एका मुलाला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून मंदिर परिसरात फोन वापरण्यास बंदी घालण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आता मंदिर प्रशासनाकडून मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, तसेच भाविकांना ‘सभ्य’ कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.