मुंबई – चित्रपट अभिनेते आणि भाजप नेते ‘मिथुन चक्रवर्ती’ यांच्या आई शांतराणी चक्रवर्ती यांचे आज (दि. 7) शुक्रवारी निधन झाले. शांतराणी ह्या आजाराने त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथुन यांचा छोटा मुलगा नमाशी चक्रवर्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सध्या त्यांची आई मुलगा मिथुन चक्रवर्तीसोबत मुंबईत राहत होती. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनावर बंगाल भाजपपासून ते सत्ताधारी टीएमसीपर्यंतच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच चित्रपट जगतातील सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
মাতৃবিয়োগের জন্য মিঠুন চক্রবর্তীকে জানাই আন্তরিক সমবেদনা। আশা করি মিঠুনদা ও তার পরিবার এই গভীর শোক সামলে উঠবে।
— Kunal Ghosh (@KunalGhoshAgain) July 7, 2023
कोविड दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांचे 21 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. आणि यावेळी अभिनेत्याने आपल्या आईलाही गमावले.
मिथुन चक्रवर्ती एकेकाळी कोलकात्यातील जोराबागन भागात आई-वडील आणि चार भावंडांसोबत राहत होते, पण जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनयाच्या जगात नाव कमावले तेव्हा तो आपल्या आई-वडिलांना घेऊन मुंबईत राहू लागला.