पुणे : घरगुती भांडणावरून लोखंडी रॉड उजव्या हातावर व डोक्यावर मारून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली.
ज्ञानेश्वर अण्णा गायकवाड (वय 32, र. विश्रांतवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. रमाबाई यांच्या खून प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यांच्या राहत्या घरात 19 जुलै 2019 रोजी ही घटना घडली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे याने फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून निल यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार एन.पी.पाटील यांनी मदत केली. स्वयपाक करण्याच्या कारणावरून खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.