मुंबई – अभिनेता अक्षयकुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री म्हणून ती फार यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न झाल्यानंतर तिने सिनेक्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने एक लेखिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने वयाच्या 48 व्या वर्षी देखील शिक्षण घेत असल्याचा खुलासा केला आहे.
ट्विंकल खन्ना सध्या लंडन विद्यापीठातील प्रसिद्ध गोल्डस्मिथमध्ये फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्स करत आहे. त्यादरम्यानचा तिने सुंदर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तिच्या कॉलेजची झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये तिने मित्र मैत्रिणींसोबत कॉफी घेताना आणि कॉलेजमध्ये धमाल करत असतानाचा अनुभव शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, ‘तुमची पन्नाशी उलटल्यावर शिक्षणासाठी विद्यापीठात परत जाण्यासारखे काय आहे? बरं, मला इथे क्लासेस करून आता नऊ महिने झाले आहेत आणि मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. सबमिशन, ग्रेड आणि कॉफीच्या हजार मग द्वारे मी स्वतःला असे पाहीन हे कोणाला माहीत होतं? काहीवेळा मला असे वाटते की मी लेखन कसं करायचं हे शिकण्याऐवजी मी जीवनातील विविध भन्नाट पर्याय अशा विषयात मास्टर्स करायला पाहिजे होतं.’
View this post on Instagram
पुढे तिने लिहीले की, ‘मला हे सर्व नवे अनुभव असतील आणि एक मित्रांची गॅंग ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकते की ते मला डेडलाइनमधून बाहेर निघायला मदत करतील लंच ब्रेकमध्ये मला हसवतील. रापलेली त्वचा, कमी झालेलं वजन आणि ऊर्जा- एकत्र तुम्ही गमावलेल्या गोष्टींना धरून बसू शकता. नाहीतर तुम्ही त्याबदल्यात काय मिळवल ते पाहू शकता. म्हातारे होणे हे गणितीय समीकरण आहे, वजाबाकी म्हणून पाहण्यापेक्षा मी त्याला गुणाकार बेरीज मानेन.’ तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.