मुंबई – दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
आदिपुरुषची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होत. टिझर वरून वाद झाल्यानंतर चित्रपटाच्या सीनमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर गेल्याच दिसून आलं. रामायणाची कथा एका नव्या अंदाजात या चित्रपटातून सांगण्यात येणार आहे.
नुकतंच, मंगळवारी आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिराजवळ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चाहत्यांच्या तुफान गर्दीत हा ट्रेलर लाँच केल्यानंतर बुधवारी क्रिती आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन केलं. मात्र देवदर्शनानंतरच्या एका व्हिडीओवरून नवीन वाद समोर आला आहे.
झालं असं की.., बुधवारी सकाळी क्रिती सेनॉनआणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस…’ केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Actress #KritiSanon and Director #OmRaut visited #Tirumala this morning to seek blessings.#Adipurush #AdipurushOnJune16th#ShreyasMedia #ShreyasGroup pic.twitter.com/qXs4IJGqni
— Shreyas Media (@shreyasgroup) June 7, 2023
“सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला. ‘तिरुमलामधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा पद्धतीने किस करणे, मिठी मारणे हे अत्यंत अपमानास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे. मात्र, अद्याप ओम राऊत किंवा क्रितीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त गजानन नागे, सोनल चौहान, वत्सल सेठ आदी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रभास भगवान राम, कृती माता सीता, सैफ अली यांची भूमिका साकारत आहे. खान लंकेश रावण आणि सनी सिंह लक्ष्मण दिसणार आहेत