पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये ही पुरवणी परीक्षा होईल.
राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागात दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची लेखी पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.