नवी दिल्ली- क्रॅक अँड किक फेम रवी तेजा हा तेलुगूमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट ‘टायगर नागेश्वर राव’ द्वारे रुपेरी पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला असून निर्मात्यांनी आयकॉनिक हॅवलॉक ब्रिज येथे चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च केला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कार्तिकेय 2’ चे निर्माते अभिषेक अग्रवाल या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या अॅक्शन ड्रामामध्ये गायत्री भारद्वाज आणि नुपूर सनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
कसा आहे ‘टायगर नागेश्वर राव’ चा फर्स्ट लूक-
रवी तेजाचा फर्स्ट लूक आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांकडून मोठया प्रमाणात पसंती मिळत आहे. या फर्स्ट लूक पोस्टमध्ये रवी तेजा वाघासारखा गर्जना करताना दिसत आहे. त्याच्या डोळ्यात विस्मय आणि चेहऱ्यावर राग आहे. निर्मात्यांनी रवी तेजाला भारतातील सर्वात मोठा चोर असे वर्णन केले आहे. सध्या रवी तेजाच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट वामसी दिग्दर्शित पिरियड फिल्म कुख्यात चोर टायगर नागेश्वर राव यांच्या जीवनावर आधारित आहे.
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने केले टिझरचे हिंदीमध्ये डबींग –
‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटाच्या टीझरला बॉलिवूड अभिनेता झान अब्राहमने आपला आवाज दिला आहे. अलीकडेच, चित्रपटाचे निर्माते, अभिषेक अग्रवाल यांनी ते व्हिडिओ आर्ट्सच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये जॉन चित्रपटाच्या टीझरचा व्हॉईसओव्हर करताना दिसत आहे.
पाच भाषांमधील पाच सुपरस्टार सादर करणार ‘टायगर नागेश्वर राव’ चे डबींग –
हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे यामध्ये तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्ती आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे या चिरटपटाचे डबिंग करणार आहेत.
दरम्यान,रवी तेजा हा दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.