बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळालं आहे. याचा आनंद काँग्रेस समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याच उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आता या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम तरुणावर सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
आरपीडी महाविद्यालयात जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील मतमोजणी झाली. मतमोजणी सुरू असताना वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मतदार केंद्राबाहेर थांबून घोषणाबाजी करत होते.
Belagavi: Congress supporters shouting Pakistan Zindabad in front of Police.#MohabbatKiDukaan by Congress. pic.twitter.com/U3Z9lvEJu7
— Facts (@BefittingFacts) May 13, 2023
मतदान केंद्रावर उभा केलेल्या बॅरिकेड्स जवळ थांबलेले काँग्रेसचे मुस्लिम तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यामुळं संबंधीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी विविध हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी यांनी सरकारतर्फे घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात दिली आहे. सामाजिक शांतता बिघडवण्यासह जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.