नगर – वर्षानुवर्ष पक्षात विसंगती व मतभेद असल्याचे चित्र दर्शविण्यात येत होते. मात्र आजच्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप जिल्हा एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले. सर्वांनी एकमताने भूमिका घेतल्याने तसेच महाविकास आघाडीने बॅंकेच्या परंपरेला छेद देऊन पक्षीय राजकारण केल्याने भाजप या निवडणुकीत उतरला.
अर्थात या निवडणुकीत मदत झाल्याने पक्षाचा विजय झाला. मात्र सहकार टिकला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत, पक्ष देखील सहकार वाढवून तो टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहकारातील ही शेवटी निवडणूक पक्षासाठी असून यापुढे पक्ष अन्य सहकारातील निवडणुकीत लक्ष देणार नसल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री संचालकांची बैठक घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीने बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षीय राजकारण केल्याचे त्यांच्या निर्देशनास आणले. भाजपच्या संचालकांना न विश्वास घेताच महाविकास आघाडीच्या संचालकांची बैठक घेऊन अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविला. बॅंकेत यापूर्वी कधीही पक्षीय राजकारण झाले नाही. सर्वांना बरोबर घेऊन कामकाज केले जाते. असे असतांना महाविकास आघाडीने परस्पर उमेदवार ठरवून भाजपच्या संचालकांना विश्वास घेतले. नाही. त्यामुळे पक्षाने ही निवडणूक करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगून खा. डॉ. विखे म्हणाले.