मुंबई – काही दिवसांपूर्वीच अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या बहुचर्चित ‘आरआरआर या ऐतिहासिक चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या लोकप्रिय तेलुगू चित्रपटाच्या गाण्याने अनेक हॉलिवूड गाण्यांना मागे टाकत हे नामांकन पटकावले.
बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता. जेव्हा पासून ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्या दिवसापासूनच सगळीकडे या चित्रपटाचा बोलबाला दिसून येत आहे. दरम्यान, नुकतंच चित्रपटातील मुख्य अभिनेता राम चरण ऑस्करसाठी परदेशी रवाना झाला आहे.
सोमवारी रात्री उशिरा हा अभिनेता विमानतळावर क्लिक झाला होता. मात्र, तेव्हा त्याच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण यावेळीही त्याने वेस्टर्नऐवजी भारतीय पोशाख परिधान केल्याचं दिसून आलं होत. यावेळी राम चरणच्या लूकने सर्वांनाच चकित केले.
कारण परदेशात जाताना लोकांचा एअरपोर्ट लूक ट्रेंडी असताना राम चरण मात्र, काळ्या कुर्त्यात दिसला. यावेळी तो अनवाणी होते. त्याच्या पायात शूज किंवा चप्पल नव्हती. यासोबतच त्याच्या कपाळावर विभूती देखील लावली होती. सध्या अभिनेता हा लूक सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे.