नवी दिल्ली – तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या 10 व्या दिवशी ढिगाऱ्याखालून दोन महिलांना जिवंत बाहेर काढण्यात आले. सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 41 हजारांच्या पुढे गेली आहे. ढिगारा हटवला जात असल्याने मृतांची संख्या वाढत आहे.
तुर्कस्तानमधील भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या कहरामास येथे 222 तासांनंतर 42 वर्षे आणि 77 वर्षे वयोगटातील दोन महिलांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. बचाव पथक आणि कुटुंबीयांसाठी हा प्रकार चमत्कारच ठरला आहे. त्याचप्रमाणे तुर्कस्तानच्या हातायमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेली एक महिला आणि तिच्या दोन मुलांना 228 तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले.
एका आकडेवारीनुसार, भूकंपानंतर 141 तासांपासून ते 228 तासांनंतर 63 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपानंतर एकीकडे चमत्कार तर दुसरीकडे हृदय पिळवटून टाकणारी असहायताही पाहायला मिळत आहे. कॉंक्रीटचा ढिगारा हलवताना एक माणूस आपल्या प्रियजनांना हाक मारताना दिसला. बराच वेळ हाक मारूनही उत्तर न आल्याने तो धीर गमावून खाली बसला. अनेक ठिकाणी बचाव कर्मचारी ढिगाऱ्याच्या आत आवाज देताना दिसत आहेत. कोणीतरी उत्तर देईल अशी आशा आहे. या दरम्यान सर्वत्र शांतता पाळली जाते.
भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सुमारे 500 किलोमीटरच्या परिघात राहणारे लोक उद्वस्त झाले आहेत. येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनेक वर्षे लागतील.