पुणे – COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाची ७ वी आवृत्ती २२ ते २४ डिसेंबर दरम्यान यशस्वीरित्या पार पडली. विद्यार्थी – आयोजित फेस्टमध्ये नुकतेच ६ मॉड्युल मध्ये विभागलेले २४ इव्हेंट्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे अनेकांनी कौतुक केले. संपूर्ण भारतातून स्पर्धक, त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आले होते, त्यामुळे महोत्सवाला एक चैतन्यशील स्थानाचा दर्जा प्राप्त झाला अर्थात देशातील तरुणांकडे असलेली विविधता आणि ऊर्जा प्रदर्शित झाली. इम्प्रेशन्स २०२२ सचिव वंश वारीकू यांच्या नेतृत्वाखाली २५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या टीमने ५ महिन्यांहून अधिक काळ हे, सर्व घडवून आणण्यासाठी काम केले.
इंप्रेशन्सच्या २०२२ आवृत्तीचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भारत गणेशपुरे यांच्या हस्ते, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुकुल सुतवणे, अधिष्ठाता – स्टूडेंट अफेअर्स डॉ. प्रद्युम्न धामणगावकर, इम्प्रेशन्स २०२२ शिक्षक सल्लागार डॉ. क्षिप्रा मोघे, इम्प्रेशन्स २०२२ सचिव वंश वारिकू आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत २२ डिसेंबर रोजी COEP Tech च्या मुख्य सभागृहात झाले. श्री. भारत गणेशपुरे यांनी या ७ व्या आवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या खास विनोदी शैलीत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. तसेच सचिवांनी विश्वास व्यक्त केला की त्यांचा संघ उत्तम कामगिरी करेल.
पहिल्या दिवशी ‘डूडली-डू’ आणि ‘कलरस्प्लॅश’ सारख्या कला स्पर्धांसोबतच ‘सावनी’, ‘नृत्यांगना’ आणि ‘व्हर्स-ए-टाइल’ अशा अनेक स्पर्धांच्या एलिमिनेशन फेरीचा समावेश होता. दिवसभरात गर्दी खेचणारी स्पर्धा ‘बॅटल ओफ डिजेज्’ ठरली, जी दुपारी उशिरा झाली. इम्प्रेशन्स २०२२ चा फूड झोन देखील एक प्रमुख हॉटस्पॉट बनला होता. प्रेक्षक आणि सहभागी पोहे आणि पावभाजीपासून ते क्यूबानोस सँडविच आणि पिझ्झा कोनपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत होते. विकल्या जाणार्या असंख्य शीतपेयेचा आनंदही उपस्थितांनी घेतला. पुण्यात संध्याकाळ होत असताना, प्रतिष्ठित ‘अमनदीप सिंग’ यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी पूर्ण गर्दीने मुख्य सभागृहात प्रवेश केला. बहुप्रतिक्षित कार्यक्रमासाठी सभागृह काठोकाठ भरलेलं दिसलं!
कार्यक्रमाचा दुसरा दिवस तिघांपैकी सर्वात व्यस्त ठरला. COEP Tech कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी सर्व ६ मॉड्युलमधील बऱ्याच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे ‘गेम ऑफ शेड्स’ आणि ‘कॉमिकिंग’ व सोबतच ‘स्ट्रीट फॉरवर्ड’ आणि ‘सो-ड्युएट’. दरम्यान, ‘हाय करंट’ मध्ये प्रतिभावान बँडचे उल्लेखनीय परफॉर्मन्स दिसले ज्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. संध्याकाळ होत असतानाच मुख्य सभागृहात ‘मल्लिका-ए-ठुमरी’ हा हिंदुस्थानी अर्ध-शास्त्रीय संगीत शैलींवर आधारित कार्यक्रम झाला. याने माजी विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थी प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित केले. दिवसाची सांगता प्रसिद्ध बँड सबालीच्या सादरीकरणाने झाली, ज्याने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शेवटच्या दिवशी मुख्यत: बहुप्रतिक्षित ‘पूना-०५’ आणि सोबतच ‘सावनी’, ‘सो-डुएट’ आणि ‘अंदाज-ए-बयान’ या कार्यक्रमांच्या अंतिम फेरीचा समावेश होता. दुपारी, विद्यापीठातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत समापन समारंभ पार पडला, ज्यामध्ये इम्प्रेशन्स २०२२ मधील कामगिरीनंतर विजयी झालेल्या प्रतिभावान स्पर्धकांनी आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. शेवटच्या संध्याकाळी इंप्रेशन्सने एक नवीन शिखर गाठले, पहिल्यांदाच COEP Tech कॅम्पस मध्ये मोठ्या काँसर्टचे आयोजन केले. इम्प्रेशन्स २०२२ मध्ये प्रसिद्ध बॉलीवूड गायिका शाल्मली खोलगडे यांनी एक अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला, व काही हजारांचा जमाव “बेशर्मी की हाईट” आणि “लत लग गई” सारख्या गाण्यांवर थिरकला. अशा प्रकारे इम्प्रेशन्स २०२२ ही ७ वी आवृत्ती उच्च पटलावर समाप्त झाली.
या आवृत्तीत २०,००० हून अधिक अभ्यागतांचा सहभाग होता,जे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीसाठी एक यश आहे कारण कोविड-19 साथीच्या नंतर पूर्णपणे ऑफलाइन आयोजित करण्यात आलेली इम्प्रेशन्सची ही पहिली आवृत्ती होती. COEP ने या वर्षाच्या सुरुवातीला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केल्यानंतर आयोजित केलेली ही पहिली आवृत्ती होती, ज्याने अपेक्षा आणखी वाढवल्या. या महोत्सवाला WAIU, Meet7, JNPA, Revins24, Trinity Bakery, Momoco, Study 24×7, Frother, Fujifilms आणि Royal Enfield सारखे समूह प्रायोजक म्हणून लाभले. तसेच प्रसिद्ध मीडिया कंपनी ‘डिजिटल प्रभात’ ची साथ होतीच. ७ व्या आवृत्तीत इम्प्रेशन्सचा ‘मॅस्कोट’ क्लियो, एक विणकर पक्षी साकारण्यात आला, जो त्याच्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे फेस्टच्या “कलाकाराने, कलाकारासाठी” या टॅगलाइनशी सुसंगत आहे व याची झलक ही पहिल्यांदाच साकारली गेली. इम्प्रेशन्सची पुढची अर्थात ८ वी आवृत्ति डिसेंबर २०२३ मध्ये पाहायला मिळेल.