वॉशिंग्टन – भारतातील तामिळनाडू राज्यातील एका मंदिरातून चोरण्यात आलेली एक मूर्ती अमेरिकेतील एका संग्रहालयात आढलळी असून ह्या मूर्तीचा ताबा मिळावा यासाठी भारत सरकार तर्फे मागणी करण्यात आली आहे 1966 मध्ये या चौलकालीन मूर्तीची चोरी करण्यात आली होती तामिळनाडूतील रामेश्वरम येथील एकांथा मंदिरामधून 1966 मध्ये सहा मूर्ती चोरण्यात आल्या होत्या,
त्यापैकी नृत्य करणाऱ्या कृष्णाची मूर्ती अमेरिकेतील एका संग्रहालयात सापडली आहे अमेरिकेतील इंडियानापोलीसमध्ये म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयामध्ये ही मूर्ती आढळून आली आहे 1966 मध्ये झालेल्या या चोरीचा तपास सीआयडी तर्फे करण्यात येत होता ज्या सहा मूर्तींची चोरी 1966 मध्ये झाली होती.
त्यांची कोणतीही छायाचित्रे उपलब्ध नव्हती अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम करून शोध घेतला असता त्यापैकी एक मूर्ती इंडियना पोलीस मधील म्युझियम मध्ये असल्याचे त्यांच्या लक्षात आले ही चोरलेलीच मूर्ती असल्याचे त्यांनी संग्रहालयाच्या संचालकांना पटवून दिले असून मूर्तीचा ताबा आम्हाला मिळावा अशा प्रकारची मागणी करणारा अर्ज कार्यकारी संचालक नारायणी यांनी अमेरिकन प्रशासनाकडे केली आहे भारतीय सीआयडी अधिकाऱ्यांनी या चोरीचा तपास घेत असताना जगभरातील म्युझियमच्या वेबसाईट तपासल्या असता त्यांना या मूर्तीचा शोध लागला त्यांनी या संग्रहालयाच्या संचालकाची संबंध संपर्क साधला असता त्यांनी ही चोरीची मूर्ती खरेदी केल्याचे लक्षात आले 1966 मध्ये चोरण्यात आलेल्या सहापैकी एका मूर्तीचा शोध लागला असल्याने इतर पाच मूर्तींच्या तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.