नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकिट नाकारण्यात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या चार आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला होता. या चार जणांना आता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, पक्षाच्या एका प्रदेश उपाध्यक्षांनाही कारवाईचा दणका बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुरेश कश्यप यांनी या पाच जणांवर पुढच्या सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तिकीट वाटपावरून भाजपमध्ये प्रचंड धुसफुस सुरू असून मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातही बंडखोरी करण्यात आली आहे.