नागपूर – नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. 13 तालुक्यांतील पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सभापती होऊ शकलेला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर समाधान मानावे लागले आहे.
जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांपैकी 9 पंचायत समितीमध्ये काॅंग्रेसचा सभापती निवडून आला आहे. तीन तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा सभापती आला आहे. तर एका तालुक्यात शिंदे गटाचा सभापती झाला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवारांची संपत्ती जाहीर; संपत्ती आणि शिक्षणात मोठा फरक https://t.co/iyW6wWC7sN
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवापूर या तालुक्यांमध्ये काॅंग्रेसला सभापतीपद मिळाले आहे. तर नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला विजय मिळाला आहे. तर रामटेक पंचायत समितीत शिंदे गटाला सभापतीपद मिळाले आहे.
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022