वॉशिंग्टन – गेल्या 48 वर्षांच्या कालावधीमध्ये जगात वन्यप्राण्यांच्या ( Wildlife ) संख्येत तब्बल सदुसष्ट टक्के घट झाली असून आशिया आणि आफ्रिकेतील जंगलांना आणि जंगलातील वन्य प्राण्यांना त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. 1970 नंतरच्या कालावधीमध्ये हवामान बदल आणि जंगलाची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली कटाई याचा एकत्रित परिणाम म्हणून वन्यप्राण्यांच्या संख्येत एवढी मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या कालावधीमध्ये आफ्रिकेतील वन्यप्राण्यांच्या ( Wildlife ) संख्येमध्ये 67% आणि आशियातील वन्यप्राण्यांच्या संख्येत 55 टक्के घट झाली आहे. वर्ल्ड वाइल्ड फंड या संस्थेने आपल्या लिविंग प्लॅनेट या ताज्या अहवालामध्ये ही सर्व माहिती प्रदर्शित केली आहे. ज्या वन्यप्राण्यांची संख्या कमी झाली आहे त्यामध्ये सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि मासे यांचा समावेश जास्त आहे.
दिवाळीपूर्वी अमूलने दिला मोठा धक्का; गुजरात वगळता देशातील इतर राज्यांमध्ये दुधाच्या किंमतीत वाढ
भारतामध्येही अशाच प्रकारची परिस्थिती असून गेल्या 48 वर्षांच्या कालावधीमध्ये गोड्या पाण्यामध्ये राहणाऱ्या कासवांची तब्बल 17 प्रजातींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी 5230 प्राण्यांच्या एकूण बत्तीस हजार लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला.
हवामान बदल प्रदूषण अनेक कारणांनी होत असलेली जंगल तोड आणि शक्तिशाली प्राण्यांचे हल्ले यामुळे या प्राण्यांच्या ( Wildlife ) संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे लक्षात आले. वर्ल्ड वाईल्ड फंडने आता अनेक प्रजातींना रेड झोनमध्ये जाहीर केले असून त्यामध्ये अमेझॉनच्या जंगलात सापडणारा पिंक डॉल्फिनचा समावेश आहे.