मुंबई – रॉकस्टार,बर्फी आणि ब्रम्हास्त्र यासारखे सुपरहिट सिनेमे देणारा रणबीर कपूरच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच रणबीर कपूर हा बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. 2012 पासून रणबीरचे नाव ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100’ च्या यादीत देखील समाविष्ट झाले आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे २००७ मध्ये रणबीरने अभिनय जगतात पदार्पण केले.सावरिया तितकं यश मिळवू शकला नसला तरी त्यानंतर रणबीरने अजब प्रेम कि गजब कहाणी,ये जवानी है दिवाणी सारखे हलके फुलके चित्रपट केले जे की प्रेक्षकांना चांगलेच आवडले. रणबीर कपूर त्याच्या अभिनय कौशल्याव्यतिरिक्त त्याच्या छंदांसाठी देखील ओळखला जातो. आलिशान गाड्यांबद्दलचे त्यांचे प्रेम कोणापासून लपलेले नाही.
रणबीर कपूरकडे लक्झरी कारचे एकापेक्षा एक असे दर्जेदार कलेक्शन आहे. त्याच्या आवडत्या कार कलेक्शनमध्ये लँड रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ऑडी ए8एल, लँड रोव्हर, रेंज रोव्हर वोग, ऑडी आर, मर्सिडीज बेंझ एएमजी जी-63 सारख्या आलिशान कारचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूरची संपत्ती 322 कोटी रुपये आहे.रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे.